मुंबई- यंदा काही राजकीय पक्षांची विभागणी झाल्याने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या कमालीची वाढली आहे. यावेळी राज्यातील २८८ पैकी तब्बल ८७ मतदारसंघात दोन ईव्हीएम मशीनचा वापर करावा लागणार आहे.राज्यात सर्वांत जास्त ३४ उमेदवार माजलगावमध्ये तर सर्वांत कमी फक्त तीन उमेदवार शहादा मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तसेच बहुजन वंचित आघाडी,
बसपा,रिपाइं आदी विविध राजकीय पक्ष उतरले आहेत.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले असल्याने त्यांचे उमेदवार वाढले आहेत. तसेच यंदा बंडखोरीही जास्त प्रमाणात दिसत आहेत.यंदा १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास त्या मतदारसंघात दोन ईव्हीएम लावावी लागणार आहेत.
राज्यातील८७ मतदारसंघात १६ पेक्षा जास्त उमेदवार आहेत.मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक उमेदवार २२ हे मानखुर्द-शिवाजीनगर तर सर्वांत कमी ६ उमेदवार हे चेंबूर व माहीममध्ये आहेत
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								








