Home / News / संजय वर्मा राज्याचेनवे पोलीस महासंचालक

संजय वर्मा राज्याचेनवे पोलीस महासंचालक

मुंबई – राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काल रश्मी...

By: E-Paper Navakal

मुंबई – राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काल रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून हटवण्यात आले. पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार विवेक फणसळकर यांच्याकडे तात्पुरता सोपविण्यात आला होता.त्यानंतर आज राज्याच्या पोलीस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली . संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे अधिकारी असून ते आता पोलिस महासंचालकपदी (तांत्रिक व विधी) कार्यरत होते.

Web Title:
संबंधित बातम्या