Home / News / शेअर बाजारात जबरदस्त वाढ! सेन्सेक्स ९०० अंकांनी उसळला

शेअर बाजारात जबरदस्त वाढ! सेन्सेक्स ९०० अंकांनी उसळला

मुंबई – शेअर बाजारात आज जबरदस्त वाढ नोंदली गेली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०१ अंकांनी ८०,३७८ अंकावर तर राष्ट्रीय शेअर...

By: E-Paper Navakal

मुंबई – शेअर बाजारात आज जबरदस्त वाढ नोंदली गेली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०१ अंकांनी ८०,३७८ अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७० अंकांच्या वाढीसह २४,४८४ अंकांवर बंद झाला.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याचा सकारत्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
सेन्सक्समधील ३० कंपन्यांपैकी २५ कंपन्यांचे शेअर आज वधारले. तर ५ कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण झाली. त्याचप्रमाणे निफ्टीच्ाय ५० शेअरपैकी ४१ शेअरमध्ये तेजी तर ९ शेअरमध्ये मंदी दिसून आली.आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ तर बँकिंग क्षेत्रात घसरण झाली.

Web Title:
संबंधित बातम्या