Home / News / मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात २६ जण जखमी ! ५ जण गंभीर

मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात २६ जण जखमी ! ५ जण गंभीर

मुंबई-पुणे महामार्गावर कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणारी खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात खोपोलीजवळ पहाटे चार वाजता झाला. बसमध्ये एकूण...

By: E-Paper Navakal

मुंबई-पुणे महामार्गावर कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणारी खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात खोपोलीजवळ पहाटे चार वाजता झाला. बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. या अपघातात २६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील ८ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघात झाल्यानंतर खोपोलीत वाहतूककोंडी झाली होती. मात्र, अपघातातील बस व ट्रक दोन्ही वाहने पुलरच्या सहाय्याने बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली.

Web Title:
संबंधित बातम्या