Home / News / डहाणू तालुक्यातील चिकूचे उत्पादन निम्म्याने घटले !

डहाणू तालुक्यातील चिकूचे उत्पादन निम्म्याने घटले !

पालघर- जगाच्या नकाशावर नावाजलेला डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध चिकू बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आला आहे.लहरी वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा येथील चिकूचे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पालघर- जगाच्या नकाशावर नावाजलेला डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध चिकू बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आला आहे.लहरी वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा येथील चिकूचे उत्पादन निम्म्याहून जास्त घटले आहे.त्यामुळे बागायतदार चिंतेत दिसत आहेत.
शेकडो वर्षांपासुन पर्यावरणाचा समतोल राखणार्‍या डहाणूच्या चिकूला भौगोलिक नामांकन मिळाले आहे. मात्र आता हाच चिकू मोठ्या संकटात सापडला आहे. सध्याचे बदलते तापमान,अवेळी पडणारा पाऊस आणि वाढत्या औद्योगिकरणामुळे चिकू फळावर कीड,रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चिकूच्या बागा कापण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याची खंत येथील बागायतदार व्यक्त करत आहेत.डहाणू तालुक्यातील घोलवड येथील चिकूला आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी असते.मात्र आता बदलत्या वातावरणामुळे हाच चिकू नाहीसा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या