Home / News / जगद्गुरू रामभद्राचार्य यांची प्रकृती अचानक खालावली

जगद्गुरू रामभद्राचार्य यांची प्रकृती अचानक खालावली

डेहराडून- जगतगुरु रामभद्राचार्य यांची काल संध्याकाळी अचानक प्रकृती खालावली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डेहराडूनच्या सिनर्जी रुग्णालयात दाखल करण्यात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

डेहराडून- जगतगुरु रामभद्राचार्य यांची काल संध्याकाळी अचानक प्रकृती खालावली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डेहराडूनच्या सिनर्जी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. न्यूमोनियामुळे त्यांना हा त्रास झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की,जगतगुरुंवर उपचार चालू आहेत,पण घाबरण्याची गरज नाही. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातही रामभद्राचार्य यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळीही त्यांच्यावर डेहराडूनच्या सिनर्जी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी एका व्हिडिओद्वारे संदेश दिला होता की, ते काही काळ विश्रांती घेत आहेत. लोकांचा विश्वास असणे महत्त्वाचे आहे. काही काळाने ते बरे झाल्यावर पुन्हा प्रवचन द्यायला येतील.

Web Title:
संबंधित बातम्या