मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सर्वसामान्य नागरिकांपासून ते विख्यात व्यक्तींपर्यत अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे अभिनेता अक्षय कुमारने यानेही विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत मतदान केले. ५६ वर्षीय अक्षयने अनेक वर्षे निवडणुकीत भारतात मतदान केले नव्हते. कारण त्याच्याकडे कॅनेडियन नागरिकत्व होते आणि त्यावरून अनेकदा त्याच्यावर टीका होत होता. अखेर गेल्या वर्षी त्याने कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारताचे नागरिकत्व घेतले. त्यानंतर आता त्याने लोकसभेनंतर पुन्हा
मतदानाचा हक्क बजावला आहे.

 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								







