Home / News / राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात थंडी सुरु असली तरी पावसाचा इशारा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात थंडी सुरु असली तरी पावसाचा इशारा दिल्याने थंडीचा मुक्काम फक्त दोनच दिवस राहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे थंडीत खंड पडण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागात थंडीने गारठला आहे. मात्र बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने राज्यात २२ नोव्हेंबरपर्यंत थंडी असेल. २३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील. तर २६ नोव्हेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा किमान तापमानात घट होऊन थंडी कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या