Home / News / पश्चिम रेल्वेच्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नाही

पश्चिम रेल्वेच्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नाही

मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी २४ नोव्हेंबर रोजी कोणाताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी या मार्गावरून प्रवास...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी २४ नोव्हेंबर रोजी कोणाताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेने रेल्वे रूळ, ओव्हरहेड आणि सिग्नल उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ३.१५ या कालावधीत वसई रोड येथील यार्ड आणि मालवाहतूक मार्गावर ब्लॉक घेतला आहे.हा मेगाब्लॉक रात्रीचा असल्याने उपनगरीय वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.या रात्रीच्या ब्लॉकमुळे रविवारी दिवसभरात पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात आला नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या
Medha Kulkarni

Medha Kulkarni : सारथी’च्या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील बैठकीवरून भाजपात अंतर्गत वाद; शासकीय राजशिष्टाचार कधीही जातीच्या आधारावर ठरत नाही – खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार आमनेसामने