Home / News / मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक!

मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक!

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार २४ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार २४ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी १०.५० ते दुपारी ३.२० पर्यंत ब्लॉक असेल.या मेगाब्लॉक कालावधीत अनेक उपनगरीय सेवा वळवल्या जातील किंवा रद्द केल्या जातील.वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ दरम्यान सुटणाऱ्या ठाण्यासाठी अप लोकल सेवाही रद्द राहतील. मेगाब्लॉकमुळे सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेससह डझनभरहून अधिक अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील.

Web Title:
संबंधित बातम्या