आयपीएलमध्ये एक कोटीची बोली! वैभवचे वय १३ वर्षेच! वडिलांचा दावा

नवी दिल्ली – आयपीएलच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने १ कोटी १० लाख रुपयांमध्ये करारबद्ध केलेल्या वैभव सूर्यवंशी याच्या वयावरून सुरू असलेल्या वादावर त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी उत्तर दिले. वैभवचे वय १३ वर्षेच आहे. राजस्थान रॉयल्स आणि बीसीसीआयनेही याआधी वैभवचे वय तपासण्यासाठी वैद्यकीय चाचणी घेतली होती,असे संजीव सूर्यवंशी यांनी सांगितले.
वैभवने क्रिकेटपटू व्हावे हे माझे स्वप्न होते. त्यासाठी वैभवला लहानपणापासून क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. त्यानेही कठोर परिश्रम करून वयाच्या आठव्या वर्षी जिल्हा स्तरावर १६ वर्षांखालील खेळाडुंच्या चाचणीमध्ये यश मिळवले होते. आता वयाच्या १३ व्या वर्षी आयपीएलमध्ये त्याला कोट्यवधींचा भाव मिळाल्यानंतर काही लोक त्याच्या वयाबद्दल संशय घेत आहेत. त्याचे वय १५ वर्षे असल्याचा दावा काही लोक करीत आहेत. त्यांना जर वैभवची पुन्हा चाचणी घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहोत,असे संजीव सूर्यवंशी म्हणाले.

Share:

More Posts