Home / News / तिलारी घाटात कर्नाटकची मिनीबस ट्रकला धडकली

तिलारी घाटात कर्नाटकची मिनीबस ट्रकला धडकली

दोडामार्ग – कर्नाटकहून गोव्याकडे चाललेली खासगी मिनी बस एका ट्रकला धडकल्याची घटना तिलारी घाटात घडली. या बसमधील काही प्रवासी किरकोळ...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

दोडामार्ग – कर्नाटकहून गोव्याकडे चाललेली खासगी मिनी बस एका ट्रकला धडकल्याची घटना तिलारी घाटात घडली. या बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
कर्नाटकातील बेळगाव शहरातून निघालेली एक मिनी खासगी बस तिलारी घाटमार्गे गोव्याकडे जात होती.ही बस तिलारी घाट उतरत असताना जयकर पॉईंटजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अणि बस एका ट्रकवर धडकली.या अपघातात बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.त्यांना बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. समोर ट्रक नसता तर ही बस खोल दरीत पडून मोठा अनर्थ घडला असता असे काही प्रवाशांनी सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या