Home / News / पुण्यातील १८ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह देवकुंड दरीत आढळला

पुण्यातील १८ वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह देवकुंड दरीत आढळला

पुणे – पुण्‍यातील कोथरूड भागातून बेपत्ता झालेल्या अठरा वर्षीय विराज फड या तरुणाचा मृतदेह रायगडमधील देवकुंड दरीत आढळला. ताम्हिणी घाटातील...

By: E-Paper Navakal

पुणे – पुण्‍यातील कोथरूड भागातून बेपत्ता झालेल्या अठरा वर्षीय विराज फड या तरुणाचा मृतदेह रायगडमधील देवकुंड दरीत आढळला. ताम्हिणी घाटातील देवकुंड व्‍हयू पॉइंट दरीतून ३० नोव्हेंबरला हा मृतदेह बचावपथकाने बाहेर काढला.
कोथरूड येथील विराज ईश्वर फड(१८) या तरुणाची सोमवारी २५ नोव्हेंबरला बेपत्ता झाल्याची तक्रार पुणे पोलीस ठाण्यात नोंदवली होती. गुरुवारी २८ नोव्हेंबरला ताम्हिणी घाट येथील देवकुंड व्ह्यू पॉईटवर काही पर्यटकांना उंच कड्याच्या शेजारी एक बॅग आढळली. त्यामध्ये मोबाईल व कपडे होते. पोलिसांच्‍या मदतीने या पर्यटकांनी बॅगमधील मोबाईल सुरू केला. तो बेपत्ता विराज फडचा असल्‍याचे समजले. त्‍यानंतर या भागातील दरीमध्‍ये विराजचा शोध सुरू झाला. वेगवेगळी बचाव पथके, अॅडव्‍हेंचर टीम, वनविभाग, पोलीस यंत्रणा विराजच्या शोधासाठी कामाला लागल्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास खोल दरीत बचाव पथकाला विराजचा मृतदेह आढळला.या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत. विराज फड या तरुणाचा मृत्यू कसा झाला ? त्याच्यासोबत नेमके काय घडले? तो दरीत कसा पडला? घटना घडली तेव्हा त्याच्याबरोबर कोणी होते का? आठवडाभर या ठिकाणी असलेली ही बॅग कोणालाही कशीच दिसली नाही? यासंदर्भातील गूढ कायम आहे. पोलीस या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या