Home / News / सांगलीत वेटरची शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या

सांगलीत वेटरची शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या

सांगली- सांगलीतील हरिपूर रोडवरील तेलंगकृपा बंगल्यासमोर दोन इसमांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राचे वार करून हत्या केली. या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सांगली- सांगलीतील हरिपूर रोडवरील तेलंगकृपा बंगल्यासमोर दोन इसमांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राचे वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत तरुण येथील संगम हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता. पोलिसांनी हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
सूरज अलिसाब सिदनाथ असे मृत तरुणाचे नाव आहे.सूरज मुळचा कर्नाटकातील बनहट्टी येथील होता.नोकरीनिमित्त तो सांगलीतील पवार प्लॉटमध्ये राहत होता.हरिपूर येथील संगम हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करत होता.मध्यरात्री सव्वाबारा वाजता तो दुचाकीवरून घराकडे चालला होता.हरिपूर येथील गुळवणी महाराज मठाजवळ त्याला हल्लेखोरांनी अडवले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळताच हल्लेखोर पसार झाले.पोलीस तपासात हे दोघेही संशयित अल्पवयीन असल्याचे आढळले .

Web Title:
संबंधित बातम्या