Home / News / भिवंडीत अग्नितांडव गोदाम जळून खाक

भिवंडीत अग्नितांडव गोदाम जळून खाक

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे प्रेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग लागली. गोदामात इलेक्ट्रॉनिक सामान असल्याने आगीचा भडका उडाला....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे प्रेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग लागली. गोदामात इलेक्ट्रॉनिक सामान असल्याने आगीचा भडका उडाला. या घटनेने परिसरातील लोकांची एकच धावाधाव झाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोले. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. गोदामात मोठ्या प्रमाणात हायड्रोलिक ऑईल, प्लास्टिकचे सामान आणि रसायने ठेवण्यात आले होते. या गोदामाला नेमकी आग कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Web Title:
संबंधित बातम्या