Home / News / आग्र्याचे विमानतळ उडवण्याची धमकी

आग्र्याचे विमानतळ उडवण्याची धमकी

आग्रा- आग्रा येथील खेरिया विमानतळ बाँम्बने उडवण्याच्या धमकीचा ईमेल आल्यामुळे विमानतळावर तातडीने तपासणी करण्यात आली. या ठिकाणी आक्षेपार्ह काहीही सापडले...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

आग्रा- आग्रा येथील खेरिया विमानतळ बाँम्बने उडवण्याच्या धमकीचा ईमेल आल्यामुळे विमानतळावर तातडीने तपासणी करण्यात आली. या ठिकाणी आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. ही केवळ धमकीच असल्याचे आढळल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आज दुपारी बाराच्या सुमारास विमानतळावरील केंद्रीय राखीव पोलीस दलाला विमानतळ उडवून देण्याचा ईमेल आला. विमानतळाच्या स्वच्छतागृहात हा बॉम्ब ठेवल्याचे ईमेलमध्ये म्हटले होते. त्यानंतर पोलीस व इतर पथकांनी विमानतळाची झडती घेतली. विमानतळाचा कोपरा न कोपरा शोधल्यानंतर या धमकीत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.
या आधी दिल्लीतील हॉटेल, ताजमहाल व आज नागपूर, गुरुग्राममधील हॉटेलांनाही अशाच प्रकारचे धमकीचे फोन आले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या