Home / News / अनंत अंबानीची द्वारका पदयात्रा दररोज रात्री २० किमी प्रवास

अनंत अंबानीची द्वारका पदयात्रा दररोज रात्री २० किमी प्रवास

मुंबई- देशातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- देशातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १७० किमी पदयात्रा सुरू केली आहे. १० एप्रिल रोजी अनंत यांचा ३० वा वाढदिवस असून त्यापूर्वी ते द्वारकेत भगवान द्वारकाधिशांचे आशीर्वाद घेणार आहेत.
सात दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या पदयात्रेत अनंत अंबानी रोज रात्री २० किलोमीटर अंतर चालत आहेत. या पदयात्रेदरम्यान या मार्गावरील विविध मंदिरांत ते दर्शन घेत आहेत. आणखी पाच दिवस ही यात्रा चालणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून ते युवकांना धर्माबद्दल आस्था ठेवावी, असा संदेश देऊ इच्छितात.दिवसा वाहतूक आणि इतर बाबींचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रात्रीच जास्तीत जास्त प्रवास करण्याचे ठरवले आहे. त्यांच्यासोबत या पदयात्रेत झेड प्लस सुरक्षा, पोलिसही आहेत. हे जवान जशी सुरक्षेची काळजी घेत आहेत, तशीच काळजी त्या-त्या भागातील स्थानिक पोलिसही काळजी घेत आहेत. या पदयात्रेत अनंत अंबानी यांनी कत्तलखान्यात नेल्या जात असलेल्या शेकडो कोंबड्यांचे प्राण वाचवल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या सर्व कोंबड्या अनंत यांनी दुप्पट किमतीला खरेदी केल्या व त्या आता काळजीपूर्वक पाळल्या जातील. अनंत अंबानी कुशिंग सिंड्रोम-एक दुर्मिळ हार्मोनल विकार, स्थूलपणा, अस्थमा आणि फुफ्फुसविकार अशा आरोग्य समस्यांनी ग्रस्त असतानाही त्यांनी पदयात्रा सुरू केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या