लॉस एंजेलिस- अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या प्रसिद्ध हॉलिवूड पॅलेडियममध्ये 25 एप्रिलला जगातील पहिली ‘स्पर्म रेस’ ही शुक्राणू शर्यत होणार आहे. ही शर्यत फक्त मनोरंजनापुरती मर्यादित नाही, तर पुरुषांच्या घटत्या प्रजनन क्षमतेबाबत जनजागृतीसाठी पार पडणार आहे. या शर्यतीत दोन प्रत्यक्ष शुक्राणू पेशी 20 सेंटीमीटर लांबीच्या सूक्ष्म ट्रॅकवर धावणार आहेत.
स्त्रीच्या प्रजनन प्रणालीची प्रतिरुप करणाऱ्या या ट्रॅकवर शुक्राणूंना सोडले जाईल आणि त्यांची शर्यत थेट प्रेक्षकांसमोर दाखवण्यात येईल. 50 वर्षांत पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या 50 टक्क्यांनी घटली असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पुरुष प्रजनन क्षमतेतील ही घट झपाट्याने वाढत आहे. या समस्येबाबत समाजात अजूनही फारसा उघडपणे संवाद होत नाही. या शर्यतीत 0.5 मिमी लांबीचे शुक्राणू 20 सेमी लांबीच्या ट्रॅकवर सोडले जातील.एक शुक्राणू सरासरीत दर मिनिटाला 5 मिमी वेगाने पुढे सरकतो. त्यामुळे संपूर्ण शर्यत 40 मिनिटांत पूर्ण होईल असा अंदाज आहे. ही शर्यत एचडी कॅमेरे आणि मायक्रोस्कोपद्वारे थेट रेकॉर्ड केली जाणार असून 4000 प्रेक्षक तिला प्रत्यक्ष पाहू शकणार आहेत.क्रीडा स्पर्धेसारखा थरार अनुभवण्यासाठी थेट कॉमेंट्री,डेटा विलेषण,स्लो-मोशन रिप्ले आणि इतर बाबी देखील असणार आहेत.प्रेक्षक आपल्या पसंतीच्या शुक्राणूवर पैज लावण्याचाही पर्याय निवडू शकतील.या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांच्या आरोग्यविषयक मुद्द्यांवर उघडपणे संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. शुक्राणूंच्या शर्यतीच्या माध्यमातून ही गंभीर बाब प्रभावीपणे लोकांसमोर मांडली जाईल.ही शर्यतहा केवळ विज्ञानाचा प्रयोग नाही,तर समाजशास्त्राचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रजनन क्षमतेबाबत जागरूकता निर्माण करतो.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







