Underwater Museum in Sindhudurg | महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातएक अनोखा प्रकल्प आकार घेत आहे. वेंगुर्ल्याजवळील निवती रॉकजवळ भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालयउभे राहणार आहे.
निवृत्त युद्धनौका INS गुलदार (INS Guldar) भोवती हे संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ भित्ती विकसित केल्या जाणार आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं.
या उपक्रमाला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. सागरी संवर्धन आणि पर्यटनाला (Tourism) चालना देणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पर्यटकांना स्कूबा डायव्हिंग आणि पुढे पाणबुडी प्रवासाचाअनुभव मिळेल. केंद्रीय पर्यटन मंत्रालयानेया प्रकल्पासाठी 46.91 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
INS गुलदार ही 1,120 टन वजनाची युद्धनौका जानेवारी 2024 मध्ये निवृत्त झाली. ती आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. युद्धनौकेची पर्यावरणीय स्वच्छता (Environmental Cleaning) पूर्ण झाली आहे. लवकरच ती पाण्यात बुडवून प्रवाळ भित्ती निर्माण केली जाईल.
हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. पर्यटन क्षेत्रासाठी हे मोठं पाऊल मानलं जात आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळेल व स्थानिक अर्थव्यवस्थेलाही (Local Economy) याचा फायदा होईल.