Home / News / Thane ४९ धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास विरोध

Thane ४९ धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास विरोध

ठाणे – ठाणे पालिका प्रशासनाकडून पावसाळ्यात इमारत कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अति धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. आतापर्यंत...

By: Team Navakal
Opposition to vacating 49 highly dangerous buildings in Thane

ठाणे – ठाणे पालिका प्रशासनाकडून पावसाळ्यात इमारत कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अति धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. आतापर्यंत शहरात असलेल्या ९० अतिधोकादायक इमारतींपैकी ४१ इमारती रिकाम्या केल्या आहेत.असे असले तरी दुसरीकडे अद्यापही ४९ इमारतीत रहिवासी राहात आहेत.२१७ कुटुंब आणि वाणिज्यमधील ५१ कुटुंबे वास्तव्यास आहेत.या इमारतीतील रहिवाशांनी इमारती रिकाम्या करण्यास नकार दिल्याने पालिकेपुढे घरे रिकामी करून घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 49 highly dangerous buildings

ठाणे पालिका क्षेत्रातील सर्वाधिक अतिधोकादायक इमारतींची संख्या ही नौपाडा भागात असून, हा आकडा ३८ एवढा आहे, तर सर्वात कमी इमारती या मुंब्रयात असून येथील आकडा हा केवळ एक आहे. कोपरीतील एकाच परिसरातील १२ इमारती या महापालिकेने अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. परंतु त्याठिकाणी काही कुटुंबाचे वास्तव्य असल्याने त्या इमारती रिकाम्या करणे पालिकेला अद्याप शक्य झालेले नाही. पालिकेने आतापर्यंत ९० पैकी ४१ इमारती रिकाम्या केल्या आहेत. त्यावर तोडक कारवाईही केली आहे. मात्र ४९ इमारतींवर अद्यापही कारवाई केलेली नाही. या इमारतींमध्ये २१७ रहिवासी कुटुंब राहत आहेत. जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे या अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यास विरोध होत आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या