पाटण – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री vikramsinh patankarयांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर (satyajit vikramsinh patankar)यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्या bjp प्रवेशाने पाटण तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.त्यातच आता शरद पवारांना सांगूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे वक्तव्य सत्यजितसिंह पाटणकर यांनी केल्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे.
भाजप प्रवेशानंतर satara जिल्ह्यात परतलेले सत्यजित पाटणकरांनी पारंपारिक राजकीय विरोधक मंत्री shambhuraj desai यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे,त्यामुळे पाटणमध्ये देसाई विरुद्ध पाटणकर सामना आणखी अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. देसाई यांच्यावर टीका करताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व गोष्टी ज्येष्ठ नेते sharad pawara यांच्या कानावर घातल्या आहेत. आम्ही वेगळ्या वाटेने गुवाहाटीला गेलो नाही. विशेष म्हणजे आपला सुरुवातीचा शिवसेना पक्षप्रवेश स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता.पण त्यानंतर आपण त्या पक्षाला काय वागणूक दिली, आपण कसे पक्ष सोडून गेलात, आपण सूरतमार्गे गुवाहाटीला कसे गेलात, अशा प्रश्नांचा भडीमार पाटणकरांनी देसाई समर्थकांवर केला आहे.पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शंभूराज देसाई यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.