मुंबई- अहमदाबादमधील कालच्या विमान अपघातावर आम्ही राजकारण करणार नाही. मात्र या अपघाताची , त्यात बळी गेलेल्यांची जबाबदारी कोण घेणार,असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. Ahamadabad plane crash 
air india dreamliner plane एअर इंडियाचे ड्रिमलायनर विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात कोसळले. याचा अर्थ विमानात काहीतरी बिघाड होता. असे असताना उड्डाणाला परवानगी कशी दिली गेली याची चौकशी होईल. कदाचित सत्य समोर येईल. पण सरकार या अपघाताची जबाबदारी नाकारू शकत नाही. टाटा समुहाने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक एक कोटी रुपये नुकसान भरपाई जाहीर केली.पण तेवढ्याने हा प्रश्न संपणारा नाही. सर्व तपासण्या करून तंत्रज्ञांनी उड्डाणाची परवानगी दिली.त्यानंतर काही सेकंदात विमानाची दोन्ही इंजिने बंद पडतात म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच आहे,असे संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात जेव्हा ड्रिमलायनर विमानांची खरेदी करण्यात आली होती तेव्हा भाजपानेच त्याच्या सुरक्षिततेवर शंका घेत विरोध केला होता,याची आठवणही राऊत यांनी करून दिली.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







