फक्त 10 हजारांच्या बजेटमध्ये iQOO Z10 Lite 5G लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

iQOO Z10 Lite 5G

iQOO Z10 Lite 5G | iQOO या Vivo च्या उप-ब्रँडने आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन iQOO Z10 Lite 5G भारतात लाँच केला आहे. एंट्री-लेव्हल सेगमेंटमधील हा फोन मोठी बॅटरी, एआय आधारित कॅमेरा क्षमता आणि आधुनिक डिझाइनसह येतो.. याची सुरुवातीची किंमत केवळ 9,999 रुपये आहे

iQOO Z10 Lite 5G ची किंमत

iQOO Z10 Lite 5G मध्ये MediaTek चा Dimensity 6300 चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: 4GB रॅम सह 128GB स्टोरेज, 6GB रॅम सह 128GB स्टोरेज आणि टॉप-एंड मॉडेल 8GB रॅम व 256GB स्टोरेजसह, ज्याची किंमत ₹12,999 आहे.

या हँडसेटची विक्री 25 जूनपासून Amazon आणि iQOO इंडियाच्या ई-स्टोअरवर सुरू होणार आहे. सुरुवातीच्या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना 500 रुपयांची त्वरित सवलत मिळणार आहे. फोन सायबर ग्रीन आणि टायटॅनियम ब्लू या दोन रंगात उफलब्ध आहे.

iQOO Z10 Lite 5G चे फीचर्स

iQOO Z10 Lite 5G मध्ये 6.74 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस सपोर्ट करतो. हा फोन Android 15 ऑपरेटिंग सिस्टिमवर Funtouch OS 15 सह चालतो. कंपनीने दोन वर्षांच्या मोठ्या सॉफ्टवेअर अपग्रेड्सची आणि तीन वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सची हमी दिली आहे.

या नवीन डिव्हाइसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची 6,000mAh बॅटरी. iQOO चा दावा आहे की, ही बॅटरी 70 तासांपर्यंत संगीत ऐकण्यासाठी किंवा 37 तासांपर्यंत व्हॉइस कॉल्ससाठी वापरता येते. 15W चार्जिंगला USB Type-C पोर्टद्वारे सपोर्ट मिळतो.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, Z10 Lite 5G मध्ये मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP चा Sony सेन्सर आणि 2MP चा बोकेह लेन्सचा समावेश आहे. समोरच्या कॅमेऱ्यात 5MP शूटर आहे. कॅमेरा सॉफ्टवेअर एआय आधारित फीचर्स दिले आहेत. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी अनेक फीचर्स मिळतील.