China’s restrictions on rare metals put 21,000 jobs at risk
नवी दिल्ली – चीनने दुर्मिळ पृथ्वी धातूंच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. यामुळे देशातील (Audio Electronics)ऑडिओ इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील २१,००० हून अधिक नोकऱ्या धोक्यात (Job Loss) आल्या आहेत, असे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडियाने (ELCINA)म्हटले आहे.
एप्रिल महिन्यात चीनने (China) टर्बियम आणि डिस्प्रोसियमसारख्या दुर्मिळ पृथ्वी घटकांवर कठोर निर्यात परवाना लागू केला. हे टर्बियम आणि डिस्प्रोसियम इलेक्ट्रॉनिकमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या एनडीएफईबी (नियोडायमियम-आयर्न-बोरॉन) चुंबकांसाठी महत्त्वाचे घटक आहेत.
इल्सिनाने स्पष्ट केले की, या निर्णयामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, यामुळे भारतातील स्पीकर निर्माते चीनमधून स्पीकर मॉड्यूल आयात करण्याकडे वळत आहेत. स्पीकर आणि ऑडिओ घटक उत्पादनात, विशेषतः नोएडा आणि दक्षिण भारतात, २१ हजारांहून अधिक नोकऱ्या धोक्यात आहेत. दुर्मिळ पृथ्वी धातू-आधारित चुंबकांचा वाटा साहित्याच्या बिलाच्या सुमारे ५-७ टक्के आहे आणि भारत त्याच्या एनडीएफईबी चुंबकाच्या गरजेच्या जवळजवळ १०० टक्के आयात करतो. त्यामध्ये एकूण आयातीपैकी ९० टक्के चीनचा वाटा आहे.