दमास्कस – सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये (Damascus) काल रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २२ जणांचा मृत्यू, तर ६३ जण जखमी झाले आहेत. ग्रीक ऑर्थोडॉक्स सेंट इलियास चर्चमध्ये (Greek Orthodox Church)प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांवर हा भीषण हल्ला करण्यात आला. इस्लामिक स्टेट (ISIS) शी संबंधित एका दहशतवाद्याने चर्चमध्ये प्रवेश करून प्रथम गोळीबार केला आणि नंतर स्वतःला स्फोटकांनी उडवून दिले.
भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरासोबत आणखी एक जण होता, ज्याने चर्चमध्ये जमलेल्या १५० ते ३५० जणांवर अंदाधुंद गोळीबार (weapon)केला. स्फोटामुळे (explosion )बेंच तुटले, फर्निचर उद्ध्वस्त (damaged )झाले, भिंती आणि छताचे नुकसान झाले.सीरिया (Syria)सरकारने घटनेची गंभीर दखल घेत धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. हा हल्ला राष्ट्रीय एकतेवर हल्ला आहे असे सीरियाचे माहिती मंत्री हमजा अल-मुस्तफा यांनी म्हटले आहे. तसेच सर्व समुदायांना शांतता राखावी असे आवाहन केले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत गीर पेडरसन यांनीही या घटनेचा निषेध करत चौकशीची मागणी केली.
