Home / देश-विदेश / बिहारमध्ये १५ वर्षीय मुलीवर ४ मुलांकडून सामूहिक अत्याचार!

बिहारमध्ये १५ वर्षीय मुलीवर ४ मुलांकडून सामूहिक अत्याचार!

पाटणा- बिहारची राजधानी पाटणामध्ये १५ वर्षीय शाळकरी मुलीवर ४ मुलांनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीने पाटणाच्या कोतवाली पोलीस...

By: Team Navakal
gang rape on 15 years old girl in bihar
Social + WhatsApp CTA

पाटणा- बिहारची राजधानी पाटणामध्ये १५ वर्षीय शाळकरी मुलीवर ४ मुलांनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीने पाटणाच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. हे चारही आरोपी अल्पवयीन असून ते इयत्ता आठवी आणि दहावीमध्ये शिकतात.

पीडितेची इन्स्टाग्रामवर एका मुलासोबत ओळख झाली. तो दीपनगर येथील रहिवासी आहे. काही दिवसातच त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या मुलाने त्याच्या इतर मित्रांसोबत तिची ओळख करून दिली. १ महिन्यापूर्वी पीडिता आपल्या प्रियकराच्या घरी गेली होती. तेव्हा त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यानंतर ते पुन्हा भेटले. मंगळवारी पीडितेचा प्रियकर तिला एका हॉटेलवर घेऊन गेला. त्याठिकाणी त्याचे मित्र आधीच आले होते. या सर्वांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. पीडिता हॉटेलमधून घरी गेली. तिने याबाबत आपल्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर तिने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या चारही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या