Home / शहर / मुंबई पालिका ६४ भूखंडांवरील झोपड्यांचा पुनर्विकास करणार ! २ जुलैला निविदा काढणार

मुंबई पालिका ६४ भूखंडांवरील झोपड्यांचा पुनर्विकास करणार ! २ जुलैला निविदा काढणार

मुंबई – मुंबई महापालिका (The Brihanmumbai Municipal Corporation)आता आपल्या मालकीच्या ६४ भूखंडांवरील झोपड्यांचा एसआरएच्या (Slum Rehabilitation Authority) धर्तीवर पुनर्विकास करणार...

By: Team Navakal
Brihanmumbai Municipal Corporation

मुंबई – मुंबई महापालिका (The Brihanmumbai Municipal Corporation)आता आपल्या मालकीच्या ६४ भूखंडांवरील झोपड्यांचा एसआरएच्या (Slum Rehabilitation Authority) धर्तीवर पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी येत्या २ जुलै रोजी निविदा (Tenders) काढल्या जाणार आहेत.

पालिकेच्या या निर्णयामुळे रखडलेल्या ६४ योजनांतील झोपडीधारकांना दिलासा मिळणार आहे. पालिका प्रशासनाने अलीकडेच निविदापूर्व बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ४० पेक्षा अधिक विकासकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये काही नामांकित विकासकांचाही समावेश होता. याबाबतच्या निविदा आता २ जुलै रोजी काढल्या जाणार आहेत. जास्त प्रीमियमची रक्‍कम देणाऱ्या विकसकांना प्रथम संधी दिली जाणार आहे. त्यामध्ये आता किती विकासक प्रतिसाद देतात, याकडे पालिकेचे लक्ष लागले. पालिकेला ६४ योजनांचा पुनर्विकास करण्यासाठी परवानगी दिली असल्याने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डीसीपीआर नियमानुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याआधी मुख्यालयात निविदापूर्व बैठक पार पडली. यात ४० पेक्षा अधिक विकासक सहभागी झाले होते. या बैठकीत संयुक्‍त पद्धतीने पुनर्विकास करण्याची परवानगी मिळावी,योजनेतील सर्व माहिती अद्ययावत करून मिळावी, अशा सूचना विकासकांनी केल्या. जास्तीत जास्त रक्‍कम देणाऱ्या विकासकाचा पुनर्विकासासाठी विचार केला जाईल.अपेक्षेपेक्षा जास्त विकासक असतील तर लॉटरी काढून निवड केली जाईल.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या