Home / क्रीडा / शुभमन गिलची विक्रमी कामगिरी, सुनील गावस्कर यांचा 54 वर्षांपूर्वीचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला

शुभमन गिलची विक्रमी कामगिरी, सुनील गावस्कर यांचा 54 वर्षांपूर्वीचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला

Ind vs Eng Test Series | भारताचा युवा कसोटी कर्णधार शुभमन गिल याने इंग्लंडविरुद्धच्या (Ind vs Eng Test Series) एडबॅस्टन...

By: Team Navakal
Ind vs Eng Test Series

Ind vs Eng Test Series | भारताचा युवा कसोटी कर्णधार शुभमन गिल याने इंग्लंडविरुद्धच्या (Ind vs Eng Test Series) एडबॅस्टन कसोटीत ऐतिहासिक कामगिरी करत अनेक रेकॉर्ड मॉडले आहेत. गिलने एकाच कसोटीत 269 धावांचे दुहेरी शतक आणि दुसऱ्या डावात 161 धावांचे शतक झळकावले.

या कामगिरीसह त्याने सुनील गावस्कर यांचा 54 वर्षांचा विक्रम मोडला आहे. गिल (Shubman Gill) एका कसोटीत 400 हून अधिक धावा करणारा 87 वर्षांतील पहिला भारतीय फलंदाज ठरला. एका कसोटीत एकूण धावसंख्येच्या बाबतीत ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे, 1990 मध्ये ग्रॅहम गूच यांनी भारताविरुद्ध केलेल्या 456 धावा केल्या होत्या. तर गिलने दुसऱ्या कसोटी दोन्ही डावात मिळून 430 धावा केल्या. या यादीत गिलने मार्क टेलर, कुमार संगकारा आणि ब्रायन लारा यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले.

गिलने सुनील गावस्कर यांचा 54 वर्षांचा विक्रमही मोडला. आतापर्यंत एका कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गावस्कर यांच्या नावावर होता. 1971 मध्ये आपल्या चौथ्याच कसोटी सामन्यात गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 344 धावा केल्या होत्या.

गिलची ऐतिहासिक कामगिरी

एडबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटीत गिलने पहिल्या डावात 269 धावा फटकावल्या, ज्यामुळे तो SENA देशांमध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला. चौथ्या दिवशी त्याने 161 धाव करून शोएब बशीरच्या चेंडूवर बाद झाला.

गिलने कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात एकाच सामन्यात दुहेरी शतक आणि 150 धावा करणारा पहिला फलंदाज म्हणून इतिहास रचला. यासह, तो एका कसोटीत दुहेरी शतक आणि शतक नोंदवणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला.

दरम्यान, रोहित शर्माच्या जागी कसोटी कर्णधार बनलेल्या गिलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी आणि नेतृत्वाची जबाबदारी सहजपणे स्वीकारली. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गजांनी चौथ्या क्रमांकावर यश मिळवले असताना, गिलनेही या स्थानावर आपली छाप पाडल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या