Home / देश-विदेश / बागेश्वर धाममध्ये धर्मशाळेची भिंत कोसळली! महिलेचा मृत्यू ! १० जण जखमी

बागेश्वर धाममध्ये धर्मशाळेची भिंत कोसळली! महिलेचा मृत्यू ! १० जण जखमी

भोपाळ – भोपाळमधील छतरपूर (Chhatarpur) थील बागेश्वर धाममध्ये (Bageshwar Dham) आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास धर्मशाळेची भिंत कोसळली. यात ढिगाऱ्याखाली...

By: Team Navakal
bageshwar baba

भोपाळ – भोपाळमधील छतरपूर (Chhatarpur) थील बागेश्वर धाममध्ये (Bageshwar Dham) आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास धर्मशाळेची भिंत कोसळली. यात ढिगाऱ्याखाली सापडलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला तर १० भाविक जखमी झाले. जखमींमध्ये (injured) उत्तर प्रदेशातील ७ जण, उत्तराखंडमधील एक आणि पश्चिम बंगालच्या दोघांचा समावेश आहे. अनिता देवी खरवार (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. ती उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील अदलहाट गावातील रहिवासी होती.

आम्ही रात्री धर्मशाळेत झोपलो होतो. यावेळी अचानक भिंत कोसळली, असे मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील ४ जणांना ग्वाल्हेरला हलवण्यात आले आहे. मुन्शीलाल कश्यप उर्फ नाथूर आहे. मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून भरपाई दिली जाईल. दरम्यान, ३ जुलै रोजी बागेश्वर धाम परिसरात एक तंबू कोसळला होता. डोक्याला लोखंडी अँगल लागल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जण जखमी झाले होते.

Web Title:
संबंधित बातम्या