ओल्ड मिस्ट रमच्या विक्रीवर कोर्टाची बंदी

Himachal Pradesh High Court


शिमला – ओल्ड मंक (Old Monk )या सुप्रसिध्द रमच्या नाममुद्रेशी साम्य असलेल्या ओल्ड मिस्ट कॉफी फ्लेव्हर्ड रम विक्री (Old Mist coffee-flavoured rum) आणि वितरणावर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने (Himachal Pradesh High Court) बंदी घातली. ओल्ड मिस्ट रमचे नाव आणि नाममुद्रा ओल्ड मंकच्या नावाशी आणि डिझाईनशी मिळतजुळती असल्याने ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे स्वामित्व हक्काचे उल्लंघन होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.


जुलै २०२३ मध्ये स्थापन झालेल्या एस्टन रोमन ब्रुअरी अँड डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (Eston Roman Brewery & Distillery Pvt. Ltd) या कंपनीने ओल्ड मिस्ट या नावाने रम बाजारात आणली होती. ती ओल्ड मंकची हुबेहूब नक्कल असल्याचे आढळून येताच ओल्ड मंकची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या मोहन मिकीन लिमिटेड या कंपनीने न्यायालयात दावा दाखल केला होता.
न्यायमूर्ती अजय मोहन गोयल (Justice Ajay Mohan Goel) यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्या. गोयल यांनी ओल्ड मंक कंपनीचा दावा ग्राह्य धरून ओल्ड मिस्ट च्या विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याचा अंतरिम आदेश दिला.