Home / महाराष्ट्र / विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द रिक्षा चालकाला चोप

विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द रिक्षा चालकाला चोप

वसई- मुंबई उपनरातील विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीय रिक्षा चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण (MNS)आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) (UBT) कार्यकर्त्यांनी चोप दिला....

By: Team Navakal
Auto rickshaw driver thrashed in Mumbai

वसई- मुंबई उपनरातील विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीय रिक्षा चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण (MNS)आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) (UBT) कार्यकर्त्यांनी चोप दिला. विरार शहर प्रमुख उदय जाधव, शिवसैनिक आणि मनसैनिकांनी या रिक्षा चालकाला चांगलाच धडा शिकवला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

या रिक्षा चालकाने यापूर्वी मराठी (Marathi) भाषेबद्दल अपशब्द वापरले होते. मराठी बोलणार नाही असे म्हणत त्याने मुजोरी केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत या मुजोर रिक्षा चालकाला चोपले. महाराष्ट्र आणि मराठी माणसाची माफी देखील या रिक्षा चालकाला मागायला लावली.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या