चंदीगड- उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे (rain) पूरसदृश (flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब राज्य (punjab) गेल्या तीन दिवसांपासून (last 3 days) पुराच्या विळख्यात आहे. राज्यातील सर्व शाळा (schools) ३० ऑगस्टपर्यंत(30th august) बंद ठेवल्या आहेत. याशिवाय पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या ३ हजार लोकांना वाचवले आहे.
या पूरस्थितीमुळे पंजाबमधील पठाणकोट, गुरुदासपूर, तरणतारन, होशियारपूर, कपूरथळा, फिरोजपूर आणि फाजिल्का हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. या ७ जिल्ह्यांतील ३५० हून अधिक गावे ५ ते ७ फूट पाण्याखाली गेली आहेत. परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याने सैन्याच्या हेलिकॉप्टर आणि वाहनांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले. चिनूक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. काल एकाच दिवशी ६ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
जम्मू काश्मीरहून रेल्वेने विशेष सेवा सुरु करून दोन विशेष गाड्यांद्वारे पर्यटकांना त्यांच्या गंतव्यस्थानी रवाना केले. यामध्ये एक रेल्वे जम्मूहून वाराणसी आणि दुसरी नवी दिल्लीकडे रवाना झाली. दोन्ही गाड्यांत प्रत्येकी १,५०० हून अधिक प्रवासी होते. दिल्लीतील यमुना नदीने २०५.४५ पोहचून धोक्याची पातळी ओलांडली. उत्तर प्रदेशातील वाराणसीसह १७ जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्यांची पातळी ८४.७३ मीटरच्या जवळ पोहोचल्याने या महिन्यात दुसऱ्यांदा पूराचे पाणी घरांमध्ये शिरले. संगम परिसरात रस्त्यांवर बोटी चालू लागल्या आहेत. आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतूक ठप्प झाली.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा-
मराठवाड्यात तुफान पाऊस अनेक गावांमध्ये पाणी शिरले
मीच देवेंद्र फडणवीसांना फोनवर रेड्डींना पाठिंबा देण्यास सांगणार ! उद्धव ठाकरेंचा टोला