Liquor Ban : गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival)पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने (District administration)कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर आणि जिल्ह्यात ३ दिवस २, ४ आणि ६ सप्टेंबर असे तीन दिवस मद्यविक्रीस बंदी घातली आहे. त्यामुळे गौरी आगमन, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) या दिवशी मद्य विक्रीसाठी उपलब्ध असणार नाही.
मिरवणुका पूर्ण होईपर्यंत सर्व मद्यविक्री दुकाने, बार आणि आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. गेल्यावर्षी संपूर्ण दहा दिवसांसाठी मद्यविक्री बंदी लागू करण्याचा आदेश दिला होता.
मात्र उच्च न्यायालयाने (High Court)या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर सुधारित आदेश जारी करून यंदा केवळ तीन महत्त्वाच्या दिवसांसाठीच बंदी लागू केली आहे. गणेशोत्सवात पुण्यात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात. यावेळी अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मॅरेथॉन स्पर्धेच्या बॅनरवरून वाद ; काँग्रेस जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा
तुम्हाला कन्नड येते का? राष्ट्रपतींना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विचारणा