Home / लेख / गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! नवीन GST नियमांमुळे Hyundai Aura झाली खूपच स्वस्त, वाचा किंमत

गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! नवीन GST नियमांमुळे Hyundai Aura झाली खूपच स्वस्त, वाचा किंमत

Hyundai Aura Price: GST च्या नवीन नियमांमुळे अनेक छोट्या आणि मोठ्या गाड्या स्वस्त होणार आहेत. अनेक कंपन्यांनी गाड्यांच्या किंमती कमी...

By: Team Navakal
Hyundai Aura

Hyundai Aura Price: GST च्या नवीन नियमांमुळे अनेक छोट्या आणि मोठ्या गाड्या स्वस्त होणार आहेत. अनेक कंपन्यांनी गाड्यांच्या किंमती कमी केल्या आहेत.

तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Hyundai Aura चा विचार करू शकता. जीएसटीचा थेट फायदा Hyundai Aura या गाडीला झाला असून येत्या 22 सप्टेंबरपासून ही कार खरेदी करणे आणखी सोपे होणार आहे.

Hyundai Aura च्या सर्वच व्हेरिएंटवर 50 हजार रुपयांपासून ते 76 हजार रुपयांची बचत होणार आहे.

Hyundai Aura Price: कारची GST नंतरची किंमत

क्रमांकमॉडेलजुनी किंमतनवीन किंमतGST कपात (रुपये)
1E₹6,54,100₹5,98,320₹55,780
2E CNG₹7,54,800₹6,90,432₹64,368
3S₹7,38,200₹6,75,248₹62,952
4SAMTजुना दर नाही₹7,38,821
5S CNG₹8,37,000₹7,65,622₹71,378
6Corporate₹7,48,190₹6,84,386₹63,804
7SX₹8,14,700₹7,53,548₹61,152
8SX CNG₹9,11,000₹8,41,635₹69,365
9SX+₹8,94,900₹8,18,584₹76,316
10SX (O)₹8,71,200₹7,99,833₹71,367

Hyundai Aura चे इंजिन आणि फीचर्स

Hyundai Aura मध्ये 1.2-लीटर कप्पा पेट्रोल इंजिन मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. हे इंजिन 83 PS ची पॉवर आणि 113.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

तसेच, या गाडीचे CNG व्हर्जन देखील उपलब्ध आहे, जे 69 PS ची पॉवर आणि 95.2 Nm चा टॉर्क देते. कंपनीच्या दाव्यानुसार, CNG मॉडेल 28 km/kg पर्यंत मायलेज देते.

सेफ्टी फीचर्स

  • Hyundai ने Aura च्या नवीन मॉडेलमध्ये 30 पेक्षा जास्त नवीन सेफ्टी फीचर्स जोडले आहेत.
  • यात साइड आणि कर्टन एअरबॅग्ससह 4 एअरबॅग्स स्टँडर्ड म्हणून मिळतात, तसेच 6 एअरबॅग्सचा पर्यायही उपलब्ध आहे.
  • कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेईकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट (VSM) आणि हिल असिस्ट कंट्रोल (HAC) सारखे अत्याधुनिक फीचर्स आहेत.
  • याशिवाय, तुम्हाला फुटवेल लाइटिंग, Type C फ्रंट USB चार्जर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) मिळते.
  • गाडीच्या बाहेरील बाजूस नवीन LED DRLs आणि कनेक्टेड डिझाइनसह LED टेल लँप्स देखील देण्यात आले आहेत.

GST मध्ये नेमका बदल काय?

नवीन GST स्लॅबनुसार, लहान पेट्रोल, पेट्रोल हायब्रीड आणि CNG गाड्यांवर आता 28% ऐवजी 18% GST लागणार आहे. ही सूट त्या गाड्यांना मिळेल, ज्यांचे इंजिन 1200cc पेक्षा कमी आहे आणि ज्यांची लांबी 4 मीटरपेक्षा जास्त नाही.

त्याचप्रमाणे, 1500cc पेक्षा कमी डिझेल इंजिन आणि 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या डिझेल गाड्यांवरही 28% ऐवजी 18% GST लागेल. याउलट, लक्झरी आणि मोठ्या गाड्यांना आता 40% कर लागू होईल.


हे देखील वाचा – तब्बल दीड लाख रुपयांची कपात! टोयोटाची सर्वात लोकप्रिय गाडी झाली खूपच स्वस्त

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या