Mumbai Pod Taxi Project: मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आता ‘पॉड टॅक्सी’ (Pod Taxi) सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांना अधिक कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत सध्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसोबतच शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी मजबूत करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रस्तावित ‘पॉड टॅक्सी’ सेवा याच उद्देशाने सुरू केली जाईल. कुर्ला-वांद्रे कॉरिडॉरमध्ये लवकरच बुलेट ट्रेन स्टेशन आणि मुंबई उच्च न्यायालयाची नवी इमारत येणार आहे, त्यामुळे या व्यावसायिक क्षेत्रातील नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढेल. या पार्श्वभूमीवर ‘पॉड टॅक्सी’ एक प्रभावी आणि अखंड वाहतूक पर्याय म्हणून उदयास येईल.
पॉड टॅक्सीमुळे मुंबईकरांना मिळणार ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ची नवी सोय
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 22, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथील प्रस्तावित 'पॉड टॅक्सी सेवे'संदर्भात बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वाढत्या शहरीकरणामुळे सार्वजनिक परिवहन… pic.twitter.com/QHeUxawB6S
प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना
फडणवीस यांनी ‘पॉड टॅक्सी’ सेवेला ‘युनिफाइड ट्रान्सपोर्ट सिस्टीम’मध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. यामुळे नागरिक एकाच स्मार्ट कार्डचा वापर करून सर्व प्रकारच्या वाहतूक साधनांचा वापर करू शकतील. प्रकल्पासाठी आवश्यक जागा मिळवण्यासाठी कुर्ला स्टेशनजवळील पोलीस वसाहतीला त्याच परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
यासोबतच, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील व्यावसायिक इमारती थेट ‘पॉड टॅक्सी’ स्टेशनला जोडल्या जाव्यात. तसेच, स्टेशनच्या आजूबाजूला असलेले स्कायवॉक्स देखील या सेवेसोबत जोडले जावेत, अशी सूचना त्यांनी केली.
या प्रकल्पामुळे केवळ शहरी गतिशीलताच (urban mobility) सुधारणार नाही, तर जास्त रहदारी असलेल्या व्यावसायिक क्षेत्रातील प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाची वाहतूक सुविधा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा – ‘तुमच्यात दम असेल तर…’; निलेश लंकेंचे गोपीचंद पडळकरांना थेट आव्हान