Diwali Muhurat Trading 2025: भारतीय शेअर बाजारात दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा आहे. या दिवशी स्टॉक एक्सचेंज बंद असते . तरी संध्याकाळी एका विशेष तासासाठी ते खुले ठेवले जाते, ज्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. यावर्षी मुहूर्त ट्रेडिंग २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळऐवजी दुपारी १.४५ ते २.४५ पर्यंत आयोजित केले आहे.
बीएसई-एनएसईने जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी हे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत आयोजित केले होते. यंदा त्यात बदल केला आहे.यंदा मुहूर्त ट्रेडिंगसाठी १५ मिनिटांचे प्री-ओपनिंग सत्र दुपारी १.३० ते १.४५ या वेळेत आयोजित केला जाईल. शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर व्यवहार करण्याची परंपरा सुमारे ६९ वर्षांपासून आहे. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी दिवाळी ही हिंदू विक्रम संवत २०८२ ची सुरुवात आहे. संपूर्ण भारतात हा सण संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याचे स्वागत करण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो. त्याचप्रमाणे हा मुहूर्त व्यापार देखील अशाच प्रकारच्या श्रद्धेशी संबंधित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार या दिवसाला गुंतवणूक सुरू करण्यासाठी एक विशेष वेळ मानतात.
मुहूर्त ट्रेडिंग टाइम स्लॉटमध्ये इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इक्विटी फ्युचर्स अँड ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरिंग (एसएलबी) यासह विविध विभागांमधील ट्रेडिंगचा समावेश असेल.
हे देखील वाचा –