WhatsApp New Translation Feature : जगभरातील लोकांशी अधिक सोयीस्कर संवाद साधता यावा यासाठी व्हॉट्सॲपने (WhatsApp) ‘मेसेज ट्रान्सलेशन्स’ (Message Translations) नावाचे एक नवीन फिचर लाँच केले आहे.
नावाप्रमाणेच, हे फिचर चॅटमधील मेसेजेसना रिअल टाइममध्ये भाषांतरित करून भाषेचा अडथळा दूर करते. व्हॉट्सॲपच्या माहितीनुसार, अँड्रॉइड यूजर्स हे फिचर वापरून संपूर्ण चॅटमधील मेसेजेस आपोआप भाषांतर करू शकतील.
WhatsApp मेसेज ट्रान्सलेशन्स फिचर असे काम करते?
व्हॉट्सअॅपच्या ब्लॉग पोस्टनुसार, ‘मेसेज ट्रान्सलेशन्स’ फिचर वैयक्तिक चॅट, ग्रुप संभाषण आणि चॅनेल अपडेट्समध्येही काम करते. हे फिचर सध्या अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्ही डिव्हाइससाठी उपलब्ध केले जात आहे.
अँड्रॉइडवर, हे फिचर सुरुवातीला इंग्रजी, स्पॅनिश, हिंदी, पोर्तुगीज, रशियन आणि अरबी या 6 भाषांना सपोर्ट करते . तर आयओएसवर लाँचच्या वेळी 19 हून अधिक भाषांना सपोर्ट मिळेल.
कोणत्याही मेसेजचे भाषांतर करण्यासाठी, यूजर्स त्या मेसेजवर थोड्या वेळ दाबून धरू शकतात. त्यानंतर त्यांना ‘ट्रान्सलेट’चा एक नवीन पर्याय दिसेल. भाषा निवडल्यानंतर, मेसेजचे भाषांतर आपोआप होईल. भविष्यात इतर भाषांचे भाषांतर करण्यासाठी वापरकर्ते आवश्यक लँग्वेज पॅक देखील डाउनलोड करू शकतात.
गोपनीयतेचे रक्षण आणि इतर AI फिचर्स
व्हॉट्सअॅपने सांगितले आहे की, हे ‘मेसेज ट्रान्सलेशन्स’ फिचर चॅट्सची गोपनीयता जपण्यासाठी डिझाइन केले आहे. भाषांतराची प्रक्रिया डिव्हाइसवरच होते, ज्यामुळे व्हॉट्सअॅपला देखील तुमच्या संभाषणातील मजकूर वाचता येत नाही.
या फिचरसह, व्हॉट्सअॅपमध्ये अलीकडच्या काळात काही एआय (AI) फिचर्स जोडले गेले आहेत. ‘रायटिंग हेल्प’ (Writing Help) नावाचे एक फिचर लाँच करण्यात आले आहे. हे फिचर ‘मेटा एआय’चा (Meta AI) वापर करून यूजर्सला मूळ मजकुरावर आधारित लेखन सूचना देते. यामध्ये वेगवेगळ्या टोन आणि स्टाईलच्या सूचनांचाही समावेश असतो.
हे देखील वाचा – पोलिसांनी अडवली फ्रेंच राष्ट्राध्यक्षांची गाडी, मॅक्रॉन यांनी थेट ट्रम्प यांना लावला फोन; व्हिडिओ व्हायरल