Rahul Gandhi Slams EC – लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)निवडणूक आयोग (Election Commisio)व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कर्नाटकातील (Karnatak Aland)आळंद विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांची (Voter Scam)नावे हटवल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर आयोगाने त्यांच्या पोर्टल आणि अॅपवर नवीन ई-साइन फिचरद्वारे आधार लिंक सुविधा उपलब्ध केली.
यासंदर्भातील इंग्रजी वृत्तपत्राचा फोटो एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर पुन्हा टीका केली. त्यांनी एक्सवर लिहिले की,ज्ञानेशजी आम्ही चोरी पकडल्यानंतर तुम्हाला कुलूप लावायची आठवण झाली. आता चोरांनाही पकडू. तर आता सीआयडीला पुरावे कधी देत आहात? तेही स्पष्ट करा.
राहुल गांधी यांनी १८ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांवर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या पोर्टल आणि अॅपवर नवीन ई-साइन फिचर केले. या नवीन सुविधेनुसार मतदार यादीत नाव नोंदवणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळणे यासाठी आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येणार आहे.त्यामुळे अर्जदाराची ओळख स्पष्ट होईल. यापूर्वी मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मोबाईल नंबरच्या आधारे फॉर्म सबमिट करता येत होता, पण त्यामध्ये व्यक्ती खरी आहे का याची खात्री होत नसे.
हे देखील वाचा –
नवरात्रीचे राजकीय नवरंग ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमाचे राजकारण
मराठवाड्याचे शेतकरी उद्ध्वस्त झाले ! पीक गेले! माती गेली! पुन्हा पावसाचा इशारा
जुहूचा भूखंड दोन महिन्यांत मित्राला बहाल ! खा. वर्षा गायकवाडांचा आरोप ! 800 कोटींचा घोटाळा