Home / शहर / Nitin Deshmukh: विधानभवन राडा प्रकरणात नितीन देशमुखांना दिलासा

Nitin Deshmukh: विधानभवन राडा प्रकरणात नितीन देशमुखांना दिलासा

Nitin Deshmukh : तीन महिन्यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनावेळी विधानभवनात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजपा (BJP) आमदार गोपीचंद पडळकर...

By: Team Navakal
Nitin Deshmukh

Nitin Deshmukh : तीन महिन्यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनावेळी विधानभवनात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजपा (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे कार्यकर्ते भिडले होते. या प्रकरणातील याचिका निकाली निघेपर्यंत तपास थांबवा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आव्हाड समर्थक नितीन देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनावेळी आव्हाड आणि पडळकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. यावेळी पडळकरांबद्दल मंगळसूत्र चोर असा उल्लेखही करण्यात आला होता. याचे पडसाद विधानभवनाच्या लॉबीमध्ये दिसले होते. आव्हाड, पडळकर समर्थकांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आव्हाडांचे कट्टर समर्थक असलेल्या देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका देशमुख यांनी अ‍ॅड. राहुल आरोटे यांच्यामार्फत दाखल केली होती.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांतर्फे कोणताही गुन्हा सिद्ध होत नसतानाही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खोट्या व क्षुल्लक तक्रारीच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करण्यात आली. दरम्यान, नितीन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईच्या घाटकोपरमधील कार्यकर्ते आहेत.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा

दीपिका-आलिया नाही तर ‘ही’ अभिनेत्री ठरली भारतातील सर्वात श्रीमंत; संपत्ती 7,790 कोटी रुपये!

नवज्योतसिंग सिद्धूची पत्नी पुन्हा विधानसभा लढवणार

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या