Home / महाराष्ट्र / Student Suicide : कल्याणमधील अजब प्रकार; कमी गुण मिळाल्याने आठवीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या

Student Suicide : कल्याणमधील अजब प्रकार; कमी गुण मिळाल्याने आठवीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या

Student Suicide : कल्याणमध्ये गुरुवारी दुपारी एका आठवीच्या विद्यार्थिनीने निवासी इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या...

By: Team Navakal
Student Suicide
Social + WhatsApp CTA

Student Suicide : कल्याणमध्ये गुरुवारी दुपारी एका आठवीच्या विद्यार्थिनीने निवासी इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय मुलीला तिच्या २० वर्षीय बहिणीसोबत शाळेच्या ओपन डेमध्ये कमी गुण मिळाल्याने तिला राग अनावर झाला होता. हि घटना कल्याणमधील रौनक सिटी कॉम्प्लेक्समध्ये घडली. गुण कमी मिळाल्याने शिवाय बहिणीला अधिक गुण मिळाल्याने नाराज झालेल्या युवतीने तिच्या घरातच असलेल्या बाल्कनीतून उडी मारली.

आत्महत्या केलेल्या मुलीची आई कामानिमित्त बाहेर होती. त्यावेळी हि घटना घडली असल्याची माहिती आहे. खडकपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि मृत्यूच्या सभोवतालची नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले, “प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की शैक्षणिक ताणतणावामुळे मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे”.


हे देखील वाचा –

Ajit Pawar : पार्थ पवारांच्या प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत?

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या