Home / देश-विदेश / Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात कमालीची वाढ..

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात कमालीची वाढ..

Gold Rate : सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा अढळ अशी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात ३५०० रुपयांची...

By: Team Navakal
Gold Rate
Social + WhatsApp CTA

Gold Rate : सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा अढळ अशी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात ३५०० रुपयांची वाढ झाली. तर,सोन्याच्या दरात देखील १२०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात देखील पुन्हा एकदा झपाटयाने वाढ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी चांदीचा दर १७४९८१ रुपये इतका होता. परंतु आज बाजार सुरु होताच चांदी १७६४५२ रुपयांवर पोहोचली. त्यानंतर चांदीच्या दरानं १७८४८९ रुपयांचा उच्चांक गाठला. म्हणजेच चांदीच्या दरात ३५० रुपयांची तेजी देखील पाहायला मिळत आहे.

देशांतर्गत बाजारातील सोन्याचा दर पाहिला असता काही वेबसाईटनुसार २४ कॅरेट सोन्याचा दर १२८६०० रुपये एक तोळा इतका आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा दर १२५५२० रुपये इतका आहे. याशिवाय, २० कॅरेट सोन्याचा दर ११४४६० रुपये इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर हा १०४१७० रुपये एवढा आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा दर ८२९५ एवढा झाला आहे. सोन्यावर ३ टक्क्यापर्यंत जीएसटी आकारला जातो. याशिवाय मेकिंग चार्जेस देखील वेगळे द्यावे लागतात.


हे देखील वाचा – Nanded Crime : सक्षमच्या मृत्यूनंतर सक्षमच्या आईची सुनेसाठी भावनिक साद

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या