Home / महाराष्ट्र / BMC Election 2026 : शरद पवार निवडणुकीत कोणाची साथ देणार? शरद पवार संजय राऊत बैठकीत नेमकं काय ठरलं? पवारांच्या निर्णयाची अधिकृत घोषणा कधी?

BMC Election 2026 : शरद पवार निवडणुकीत कोणाची साथ देणार? शरद पवार संजय राऊत बैठकीत नेमकं काय ठरलं? पवारांच्या निर्णयाची अधिकृत घोषणा कधी?

BMC Election 2026 : आगामी मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर महानगरपालिका निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सगळ्याच पक्षांमधील सत्याने होत असलेला...

By: Team Navakal
BMC Election 2026
Social + WhatsApp CTA

BMC Election 2026 : आगामी मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर महानगरपालिका निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सगळ्याच पक्षांमधील सत्याने होत असलेला उलट फेर वारंवार दिसून येत आहे. दरम्यान जागावाटप तसेच निवडणुकींच्या इतर महत्वाच्या विषयांबाबात चर्चा करण्यासाठी पक्षापक्षांमध्ये बैठका होत आहेत. अशात उद्धव ठाकरेंच्या (Shivsena UBT) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात आणि इतर काही राजकीय विषयांबाबत चर्चेसाठी आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते.

शरद पवार यांचा पक्ष कोणासोबत?
आज दुपारी ११:४५ वाजताच्या सुमारास संजय राऊत पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले होते. जिथं खासदार संजय राऊत आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. हि बैठक जवळपास २० ते २५ सुरु होती.

बैठक संपल्यावर माध्यमांशी न बोलताच संजय राऊत परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र अधिकच्या मिळालेल्या माहीतीनुसार या राजकीय भेटीदरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक आणि राज्यातील इतर निवडणुकींबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली याच बरोबर शरद पवार यांचा पक्ष कोणासोबत लढणार? या विषयांवर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पवारांच्या या निर्णयाची अधिकृत घोषणा कधी होणार यावर सामान्यांचे पूर्ण लक्ष लागून राहिले आहे.


हे देखील वाचा – UBT MNS Alliance : ठाकरे बंधूंचा धमाका! अजून ४ महापालिकेत एकत्र लढणार?

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या