Home / महाराष्ट्र / Election 2025 : महाराष्ट्रात एकूण किती टक्के मतदान; नगरपालिकेची मतमोजणीला उद्या सुरवात; किती वाजता सुरु करणार मतमोजणी?

Election 2025 : महाराष्ट्रात एकूण किती टक्के मतदान; नगरपालिकेची मतमोजणीला उद्या सुरवात; किती वाजता सुरु करणार मतमोजणी?

Election 2025 : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता सर्वाना वेध लागले ते म्हणजे मतमोजणीचे. हि मतमोजणी नेमकी किती वाजता सुरू...

By: Team Navakal
Election 2025
Social + WhatsApp CTA

Election 2025 : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता सर्वाना वेध लागले ते म्हणजे मतमोजणीचे. हि मतमोजणी नेमकी किती वाजता सुरू होणार आणि आपल्या प्रभागाचा निकाल कधी कळणार? याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होत. मात्र काही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमभंग झाल्याच्या तक्रारी वारंवार दाखल होत होत्या. विशेषतः काही नगरपरिषदांमध्ये उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता सरळ निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ही बाब नियमबाह्य ठरल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

या प्रकरणांवर अपील दाखल झाल्याने संबंधित ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती लागली. नियमानुसार २२ नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही निवडणुका मात्र पुढे ढकलण्यात आल्या. परिणामी, राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्य पदांसाठी तसेच विविध ठिकाणच्या १४३ रिक्त सदस्य पदांसाठी मतदानाची नवीन तारीख निश्चित केली गेली.

या सर्व जागांसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली. मतदानानंतर लगेचच पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतमोजणी असतो. सर्व संबंधित नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी उद्या होणार आहे. उद्या सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे.

याच बरोबर आज राज्यातील २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राज्यात सरासरी ५० टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची, त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाणार आहे.

आजच्या निवडणुकांची मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे-
हिंगोली-५९
लातूर- ५६
नाशिक- ५२
बुलढाणा- ४८
पुणे- ४८
वर्धा- ४७
अंबरनाथ – ४६
वाशिम- ४५
पंढरपूर- ४५

हे देखील वाचा – National Herald Case : सोनिया,राहुल गांधींना दिलासा दिल्याविरोधात ईडी हायकोर्टात

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या