5G Phones Under 10000 : तंत्रज्ञानाच्या युगात आता ५जी इंटरनेटचा वापर वेगाने वाढत आहे, पण त्यासाठी महागडा फोन घेण्याची गरज उरलेली नाही. २०२५ मध्ये अनेक कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे तगडे ५जी स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत.
जर तुमचे बजेट १० हजार रुपयांपर्यंत असेल, तर तुम्हाला केवळ वेगवान इंटरनेटच नाही तर दमदार बॅटरी आणि उत्तम कॅमेरा असलेले पर्यायही उपलब्ध आहेत. खालील ५ फोन्स सध्या मार्केटमध्ये चर्चेत आहेत:
१. Vivo Y19e 5G
विवोचा हा स्मार्टफोन ८,९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. ज्यांना स्टायलिश लुक आणि चांगला बॅटरी बॅकअप हवा आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात ५५०० mAh ची बॅटरी, ६४ GB स्टोरेज आणि Unisoc T7225 प्रोसेसर देण्यात आला आहे.
२. Infinix HOT 60i 5G
जर तुमचे प्राधान्य फोटोग्राफीला असेल, तर ९,९९९ रुपयांचा हा फोन तुम्हाला ५० MP चा जबरदस्त कॅमेरा ऑफर करतो. यामध्ये MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर असून १८ W फास्ट चार्जिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे.
३. Realme C71
बॅटरीच्या बाबतीत हा फोन सर्वांना मागे टाकतो. सवलतीनंतर ८,६९९ रुपयांत मिळणाऱ्या या डिव्हाइसमध्ये चक्क ६३०० mAh ची मोठी बॅटरी आहे. प्रवासात किंवा जास्त वापरासाठी हा ५जी फोन अतिशय उपयुक्त ठरू शकतो.
४. Lava Bold N1 5G
अत्यंत कमी किमतीत म्हणजेच केवळ ७,९९९ रुपयांत ५जी हवा असेल, तर लाव्हाचा हा फोन बेस्ट आहे. ६.७५ इंचाचा मोठा डिस्प्ले आणि अद्ययावत अँड्रॉइड १५ आधारित सॉफ्टवेअरमुळे हा या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त आणि आधुनिक पर्यायांपैकी एक आहे.
५. Samsung Galaxy F06 5G
ब्रँड व्हॅल्यू आणि टिकाऊपणा शोधणाऱ्यांसाठी सॅमसंगचा हा फोन ९,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. ६.७ इंचाचा डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरमुळे यावर गेमिंग आणि मल्टीटास्किंग सहज शक्य आहे.
हे देखील वाचा – India Bangladesh Bilateral Ties : भारत-बांगलादेश संबंधात पुन्हा ठिणगी; बांगलादेशने व्हिसा सेवा रोखली; कारण काय?









