Home / लेख / Shubh Shravani Serial: झी मराठीवर सुरू होणार नवीन मालिका ‘शुभ श्रावणी’; वल्लरी विराजचे कमबॅक, जाणून घ्या वेळ आणि तारीख

Shubh Shravani Serial: झी मराठीवर सुरू होणार नवीन मालिका ‘शुभ श्रावणी’; वल्लरी विराजचे कमबॅक, जाणून घ्या वेळ आणि तारीख

Shubh Shravani Serial: झी मराठी वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी नवीन वर्षात एक मोठी भेट आणली आहे. वाहिनीने ‘शुभ श्रावणी’ या नवीन...

By: Team Navakal
Shubh Shravani Serial
Social + WhatsApp CTA

Shubh Shravani Serial: झी मराठी वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी नवीन वर्षात एक मोठी भेट आणली आहे. वाहिनीने ‘शुभ श्रावणी’ या नवीन मालिकेची अधिकृत घोषणा केली असून, या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वल्लरी विराज पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील ‘लीला’च्या भूमिकेनंतर आता वल्लरी ‘श्रावणी’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तारीख आणि वेळेची घोषणा

‘शुभ श्रावणी’ ही मालिका १९ जानेवारीपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जाणार आहे. सध्या या वेळेत ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नवीन मालिकेच्या आगमनामुळे ‘पारू’ मालिकेची वेळ बदलणार की ही मालिका निरोप घेणार, याबाबत अद्याप वाहिनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर यावरून मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

दिग्गज कलाकारांची फौज

या मालिकेत वल्लरी विराजसोबत अभिनेता सुमित विजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुमितचा झी मराठीवरील हा पहिलाच मोठा प्रकल्प आहे. याशिवाय, तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेते लोकेश गुप्ते छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. ते या मालिकेत श्रावणीच्या वडिलांची (शिक्षणमंत्री) भूमिका साकारत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी, जुई तनपुरे आणि कोमल शेटे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

काय आहे मालिकेचे कथानक?

मालिकेची कथा श्रावणी आणि शुभंकर यांच्याभोवती फिरते. श्रावणी एका मोठ्या राजकीय कुटुंबातील मुलगी आहे, मात्र ती वडिलांच्या प्रेमापासून वंचित आहे. तिचे वडील आपल्या मुलीपेक्षा घरातील पाळीव श्वानाला जास्त महत्त्व देतात, असा काहीसा प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. दुसरीकडे शुभंकर हा गरीब घरातील असला तरी अत्यंत हुशार आणि प्रेमळ मुलगा आहे. तो श्रावणीच्या घरी तिच्या वडिलांसाठी काम करतो. एका मोठ्या महालात राहूनही एककी असलेल्या श्रावणीला शुभंकरची साथ कशी मिळते, ही या मालिकेची मुख्य संकल्पना आहे.

नव्या प्रोमोमध्ये श्रावणी आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असताना शुभंकर तिला वडिलांचे पेन देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देतो, हा प्रसंग नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता ही नवी जोडी प्रेक्षकांच्या मनावर काय जादू करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे देखील वाचा – Bank Strike 2026: सलग 3 दिवस बँका राहणार बंद! 27 जानेवारीला देशव्यापी संपाची हाक; ‘या’ कामांसाठी ग्राहकांची होऊ शकते ओढाताण

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या