Jio Prepaid Plans : जर तुम्ही नेटफ्लिक्सवरील चित्रपट आणि वेब सीरिजचे शौकीन असाल, तर रिलायन्स जिओने २०२६ मध्ये तुमच्यासाठी काही जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅन्समध्ये केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही, तर नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्रगत एआय सुविधांचा लाभही ग्राहकांना मिळत आहे.
१. १७९९ रुपयांचा जिओ नेटफ्लिक्स प्लॅन
हा प्लॅन अशा लोकांसाठी आहे ज्यांना मनोरंजनाचा परिपूर्ण अनुभव हवा आहे. यामध्ये नेटफ्लिक्सचे बेसिक सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत दिले जाते, ज्यामुळे तुम्ही मोबाईलसह टीव्हीवरही कंटेंट पाहू शकता.
- वैधता आणि डेटा: या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असून यात दररोज ३ जीबी ४जी डेटा आणि अनलिमिटेड ५जी डेटा मिळतो.
- इतर फायदे: यात ३ महिन्यांसाठी जिओ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तसेच, तब्बल ३५,००० रुपये किमतीचे गुगल जेमिनी प्रोचे १८ महिन्यांचे सबस्क्रिप्शनही ग्राहकांना मोफत दिले जात आहे. याशिवाय ५० जीबी क्लाउड स्टोरेज आणि जिओ होमचा २ महिन्यांचा मोफत ट्रायलही यात समाविष्ट आहे.
२. १२९९ रुपयांचा जिओ नेटफ्लिक्स प्लॅन
ज्यांना कमी किमतीत नेटफ्लिक्स हवे आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात नेटफ्लिक्सचे मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते, म्हणजेच तुम्ही केवळ मोबाईलवरच नेटफ्लिक्स पाहू शकता.
- वैधता आणि डेटा: या प्लॅनची वैधताही ८४ दिवसांची आहे. यात दररोज २ जीबी ४जी डेटा आणि अनलिमिटेड ५जी डेटाची सुविधा मिळते.
- इतर फायदे: या प्लॅनमध्येही १७९९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणे एआय आणि इतर ओटीटी फायदे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ओटीटी प्रेमींसाठी इतर पर्याय
जिओकडे केवळ नेटफ्लिक्सच नाही, तर इतरही अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. यामध्ये ॲमेझॉन प्राईम लाईट, झी ५, सोनी लिव्ह, फॅनकोड आणि जिओ सावन प्रो यांसारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश असलेले बंडल प्लॅन्सही ग्राहक निवडू शकतात. जर तुम्हाला सध्याच्या रिचार्जवर केवळ हॉटस्टार हवे असेल, तर जिओचे १५ जीबी डेटा असलेले ॲड-ऑन प्लॅन्सही बाजारात उपलब्ध आहेत.









