Home / महाराष्ट्र / Metro accident : मेट्रोच्या अपघातानंतर भरपाईसाठी उत्तर भारतीय कामगार, नेते एकत्र

Metro accident : मेट्रोच्या अपघातानंतर भरपाईसाठी उत्तर भारतीय कामगार, नेते एकत्र

Metro accident : मुलुंड पश्चिमेला लाल बहादूर मार्गावर मेट्रो-4 च्या भिंतीचा एक मोठा भाग कोसळून रामधन यादव यांचा मृत्यू झाला....

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


Metro accident : मुलुंड पश्चिमेला लाल बहादूर मार्गावर मेट्रो-4 च्या भिंतीचा एक मोठा भाग कोसळून रामधन यादव यांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यातील एकावर काल रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली, तर गंभीर जखमी रिक्षाचालक राजकुमार यादववर उपचार सुरू आहेत. तर महेंद्र यादव यांची प्रकृती ठिक आहे. हा अपघात झाल्यानंतर उत्तर भारतीय एकत्र येऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत. मृताच्या कुटुंबाला सरकारने जाहीर केलेली 15 लाख रुपयांची भरपाई मिळावी आणि जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील उत्तर भारतीय कामगार आणि नेते एकत्र एकजुटीने प्रयत्न करीत आहेत.


आजवर महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, राजस्थान अशा विविध राज्यातील नागरीक कामासाठी येत आहेत. यापैकी कुणाला अपघात झाला तर त्यांची काळजी घ्यायला किंवा मृत झाल्यास त्याचे पार्थिव नेण्यास मदत करणारे फारसे कुणी नसायचे, त्यांची कुटुंबे गावी असल्याने ही सर्व प्रक्रिया विलंबाने होत असे आणि ती खर्चिकही होत होती. भरपाईच्या रकमेसाठी गावातून मुंबईला येणे जमत नसल्याने कुटुंबापर्यंत भरपाईची रक्कम अनेकदा पोहचत नव्हती. आता मात्र येथे काम करणारे त्या त्या राज्याचे नागरिक एकत्र येऊन दबाव गट तयार करू लागले आहेत.


या प्रकरणात चौकशीनंतर महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी संबंधित प्रकल्पाची जबाबदारी असलेले कार्यकारी अभियंते सत्यजीत साळवे यांना निलंबित केले आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प संचालक हरीश चौहान, प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सपकाळ, उपव्यवस्थापक सौरभ सिंह, पर्यवेक्षक प्रशांत भोईर आणि प्रकल्प व्यवस्थापक अवधूत इनामदार या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.


आज या पाच आरोपींना दादर-भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील डीबी हिल कन्सल्टंटशी संबंधित एक अधिकारी आणि आणखी एक आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकाद्वारे कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. याबाबत रामधानी यादव यांचे पुतणे म्हणाले की, ज्यांचा मृत्यू झाला ते माझे काका होते. काल आम्हाला अनेक आश्‍वासने देण्यात आली. पण अजूनही काही झाले नाही. लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह गावी कसे घेऊन जाणार? रुग्णालयात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी प्रशासन आलेले नाही.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या