iPhone 17 Pro : ॲपल दरवर्षी आपली नवीन फ्लॅगशिप सिरीज लाँच करण्याच्या तयारीत असते, त्यामुळे जुन्या मॉडेल्सच्या किमतीत मोठी कपात केली जाते. सध्या विजय सेल्स या प्रसिद्ध रिटेल प्लॅटफॉर्मवर iPhone 17 Pro वर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. जर तुम्हाला नवीन सिरीजची वाट पाहायची नसेल, तर हाय-एंड फीचर्स असलेला हा फोन खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे.
किंमत आणि जबरदस्त बँक ऑफर्स
iPhone 17 Pro चे 256GB स्टोअरेज व्हेरिएंट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 1,34,900 रुपयांना लाँच करण्यात आले होते. मात्र, आता विजय सेल्सवर हा फोन 1,32,490 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना बँक ऑफर्सचाही फायदा घेता येणार आहे. HSBC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला थेट 6,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. या ऑफरनंतर आयफोनची प्रभावी किंमत केवळ 1,26,490 रुपये इतकी होईल.
iPhone 17 Pro ची प्रमुख वैशिष्ट्ये:
- डिस्प्ले: 6.3 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले (रिफ्रेश रेट 120Hz).
- प्रोसेसर: ॲपलचे शक्तिशाली A19 प्रो चिपसेट.
- ब्राइटनेस: 3,000 निट्सची पीक ब्राइटनेस, ज्यामुळे उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते.
- मुख्य कॅमेरा: 48 मेगापिक्सलचा प्रायमरी फ्युजन कॅमेरा.
- अल्ट्रा वाईड: 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड लेन्स.
- टेलिफोटो: 48 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा.
- सेल्फी: 18 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.
- टिकाऊपणा: धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग (6 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे सुरक्षित).
शक्तिशाली प्रोसेसरमुळे यामध्ये गेमिंग आणि मल्टीटास्किंग अतिशय वेगवान होते. फोटोग्राफी प्रेमींसाठी देखील हा फोन एक वरदान आहे, कारण यामध्ये सर्व लेन्स 48 मेगापिक्सलच्या देण्यात आल्या आहेत.













