iPhone 17e vs Pixel 10a: टेक विश्वातील दोन दिग्गज कंपन्या, Apple आणि Google, यांच्यात आता ‘बजेट फ्लॅगशिप’ श्रेणीत मोठी लढत पाहायला मिळणार आहे. Apple ने आपला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त मानला जाणारा iPhone 17e सादर केला आहे, तर Google ने देखील Pixel 10a द्वारे त्याला तगडे आव्हान दिले आहे.
या दोन्ही फोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
iPhone 17e vs Pixel 10a: डिस्प्ले आणि स्क्रीनचा दर्जा
दोन्ही फोनच्या स्क्रीनमध्ये लक्षणीय फरक आहे. iPhone 17e मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले असून तो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी यात प्रगत सिरेमिक शील्ड 2 वापरले आहे. दुसरीकडे, Pixel 10a मध्ये 6.3 इंचाचा थोडा मोठा डिस्प्ले असून त्यात 120Hz चा हाय रिफ्रेश रेट मिळतो, जो गेमिंग आणि स्क्रोलिंगसाठी अधिक स्मूथ अनुभव देतो. पिक्सेलमध्ये गोरिल्ला ग्लास 7i चे संरक्षण देण्यात आले आहे.
iPhone 17e vs Pixel 10a: कॅमेरा: कोणाचे पारडे जड?
कॅमेरा सेटअपमध्ये Google बाजी मारताना दिसत आहे. iPhone 17e मध्ये मागच्या बाजूला केवळ 48MP चा एकच कॅमेरा मिळतो. याउलट, Pixel 10a मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला असून यात 48MP मुख्य लेन्ससह 13MP ची अल्ट्रा-वाइड लेन्स देखील मिळते. सेल्फीसाठी आयफोनमध्ये 12MP तर पिक्सेलमध्ये 13MP चा कॅमेरा आहे. ज्यांना वेगवेगळ्या अँगलने फोटोग्राफी करायची आहे, त्यांच्यासाठी पिक्सेल अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.
iPhone 17e vs Pixel 10a: प्रोसेसर आणि बॅटरी बॅकअप
आयफोनमध्ये Apple ची सर्वात नवीन A19 चिप देण्यात आली आहे, जी आपल्या वेगासाठी ओळखली जाते. पिक्सेलमध्ये Google ची Tensor G4 चिप आहे, जी विशेषतः AI फीचर्ससाठी डिझाइन केलेली आहे. बॅटरीच्या बाबतीत पिक्सेलमध्ये 5,100mAh ची मोठी बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंग मिळते. ॲपलने बॅटरीची क्षमता स्पष्ट केली नसली तरी, 26 तास व्हिडिओ चालू शकेल इतका बॅकअप मिळेल असा दावा केला आहे.
iPhone 17e vs Pixel 10a: किंमतीतील मोठी तफावत
किंमतीचा विचार केल्यास दोन्ही फोनमध्ये मोठी दरी आहे. iPhone 17e ची सुरुवातीची किंमत 64,900 रुपये आहे. तर Google Pixel 10a हा फोन केवळ 49,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच पिक्सेल हा आयफोनच्या तुलनेत तब्बल 15 हजार रुपयांनी स्वस्त आहे.
हे देखील वाचा – Crude Oil Price Hike: युद्धाचा फटका सामान्यांना! पेट्रोल आणि डिझेलचे दर 200 रुपयांच्या पार जाणार का? जाणून घ्या










