T20 World Cup 2026 Final: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या थरारक उपांत्य सामन्यात इंग्लंडवर ७ धावांनी मात करत भारतीय संघाने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता विजेतेपदासाठी भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
या विजयामुळे भारतीय संघ इतिहासाच्या उंबरठ्यावर उभा असून, जेतेपद पटकावल्यास भारत विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान देश ठरेल.
उपांत्य सामन्यातील थरार
उपांत्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या धमाकेदार ८९ धावांच्या जोरावर २५३ धावांचा डोंगर उभारला होता. इंग्लंडनेही या आव्हानाचा पाठलाग करताना जॅकब बेथेलच्या १०५ धावांच्या खेळीमुळे तगडी फाईट दिली, मात्र भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीमुळे त्यांना २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४९९ धावा केल्या, जो टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा धावसंख्यांचा आकडा ठरला आहे.
IND vs NZ: अंतिम सामन्याची माहिती
- सामन्याची तारीख: रविवार, ८ मार्च २०२६.
- वेळ: भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता.
- स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.
थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंग
हा ऐतिहासिक सामना तुम्ही खालील माध्यमांवर पाहू शकता:
१. टीव्ही: स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.
२. ऑनलाईन स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
३. तिकीट बुकिंग: सामन्याची तिकिटे बुक माय शो (BookMyShow) वर उपलब्ध होतील. तिकीट खरेदी करताना अधिकृत प्लॅटफॉर्मचाच वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संघ:
न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जॅकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काईल जेमिसन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सेफर्ट, ईश सोढी, कोल मॅकोन्ची.
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, इशान किशन, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, टिळक वर्मा.
हे देखील वाचा – Cyber Crime in Maharashtra: सायबर भामट्यांची मोठी लूट! महाराष्ट्रात दोन वर्षांत ७,५९२ कोटींचा गंडा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती












